Skip to main content

What is life insurance

विकिपीडिया
आयुर्विमा ही एखाद्या संस्था किंवा व्यक्तीने कोणा एका व्यक्तीच्या मृत्युपश्चात आर्थिक भरपाई देण्याचे वचन आहे.
विमा काढलेल्‍या व्यक्तीच्या मृत्यूमधुन उद्भवणारे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी हे संरक्षण म्हणून वापरले जाते. याने विमा काढलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास (क्वचितप्रसंगी एम्प्लॉयर[मराठी शब्द सुचवा]ला) व्यक्तीच्या मृत्यूनंतर आर्थिक सहाय्य मिळते. आयुर्विमा अंतर्गत व्यक्ती विशिष्ट वर्षे जगेल असे वचन देण्यात येते व असे न झाल्यास म्‍हणजेच विमा केलेली व्यक्ती निर्दिष्‍ट वेळेच्या आत मरण पावल्यास मृत व्यक्तीच्या वारसास विशिष्‍ट रक्कम मिळते.

इतिहाससंपादन करा

विमा व्यवसायाची सुरुवात लंडनमधल्या लाईट कॉफी हाऊसमधील व्यापाऱ्यांनी केली. या हाऊसमध्ये एकत्रित येणाऱ्या व्यापाऱ्यांनी जहाज वाहतुकीत असणारे धोके आणि मालाचे नुकसान यांवर भागीदारी करून कोणाचेही आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न केला.
भारतात विमा व्यवसायाची सुरुवात ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स को. लिमिटेड या कंपनीने केली. पण भारताची पहिली विमा कंपनी १८७० मध्ये मुंबईत ‘बॉम्बे म्युचुअल अश्युरंन्स सोसायटी लिमिटेड’ नावाने स्थापन झाली. त्यानंतर भारत इन्शुरन्स कंपनी १८९६ मध्ये दिल्लीत इम्पेरीअल इंपेरीअर ऑफ इंडिया १८९७ मध्ये मुंबईत, युनायटेड इंडिया चेन्नईत, नशनल इंडियन आणि हिंदुस्थान को – ऑपरेटिव्ह कलकत्ता आदि विमा कंपन्या आल्या.पुढे लाहोरमध्ये ‘को ऑपरेटिव्ह एश्युरन्स’ मुंबईत ‘बॉम्बे लाईफ’ ‘द इंडियन’ ‘न्यु इंडिया’ ‘द ज्युपिटर’ आणि दिल्लीत ‘द लक्ष्मी’ या कंपन्या आल्या.
१९५६ मध्ये विमा व्यवसायाचे नशनलायझेशन होऊन १ सप्टेंबर, १९५६ रोजी ‘लाईफ इन्शुरन्स कोऑपरेशन ऑफ इंडिया’ (एलआयसी) स्थापन झाले. परंतु ३१ ऑगस्ट २००७ पासून सोळा नवीन कंपन्यांना विमा व्यवसायाची परवानगी देण्यात आली. कार्याच्या दृष्टीकोनातून विमा संभाव्यतेच्या सिद्धांतावर आधारलेली अशी सहकारी व्यवस्था आहे की ज्यामध्ये सर्वांच्या सहयोगाने नुकसान भरपाई निमित्ताने एक धनसंचय निर्माण केला जातो आणि अनेक व्यक्तींच्या जोखमीचे वितरण सर्व समुदायामध्ये केले जाते.




Comments